Research article | Open Access | Published: March 27, 2023

भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या: एक अभ्यास

रावसाहेब पिराजी इंगळे

अर्थशास्त्र विभाग, योगी तुळशीराम पवार महाविद्यालय, हाडोळती, जिल्हा लातूर ४१३५१४ महाराष्ट्र, भारत

Abstract

भारत हा कृषीप्रधान देश आहे पण या देशातील शेतकरी मात्र दु:खी, दारिद्र्य आहे. असेच आपणाला म्हणावे लागेल कारण दुःख व दारिद्र्याने जीवनात आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या लोकांची आकडेवारी पाहता त्यात सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांनीच केल्या आहेत. भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक संकटामुळे शेती उत्पादनात होणारी घट शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे व वाढता कर्जाचा डोंगर यामुळे भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचा अहवाल राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने व्यक्त केला आहे. अगदी अलीकडील काळात म्हणजे 2020 मध्ये देशात एकूण 5579 शेतकऱ्यांनी विविध कारणातून भारतातील शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची माहिती तत्कालीन कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली होती. 2019 ला देशात पाच हजार 957 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. 2020 मध्ये 2019 च्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्ये किंचित घट झाली असली तरी हा आकडा कमी नाही. कृषी प्रधान अर्थव्यवस्थेत शेतकरी आत्महत्येचे कारणे सांगताना NCRB ने कौटुंबिक समस्या, आजारपण, अमली पदार्थांचा गैरवापर, व्यसन, प्रेमप्रकरणे, विवाहसंबंधीचे मुद्दे, परीक्षेतील अपयश, संपत्ती वाद इत्यादी कारणे दिलेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशक उलटून गेली तरी भारत सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देता आला नाही असेच म्हणावे लागेल. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हा आज अन्नसुरक्षा योजनेद्वारे स्वस्त धान्य दुकानाच्या रांगेस उभारून धान्य खरेदी करतो. याचे मुख्य कारण म्हणजे पारंपरिक पद्धतीची शेती ही आहे.

Keywords

शेती, आत्महत्या, कारणे, दारिद्र्य, बेकारी

© 2023 AAASSHER. All rights reserved.

Scroll to Top