Latest Issue

Research article | Open Access | Published: March 15, 2023

पंडिता रमाबाई यांची पुरोगामी विचारसरणी व कार्य - एक ऐतिहासिक अध्ययन

अनंत नामदेवराव शिंदे

इतिहास विभाग, कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर, ४१३५१७ भारत

प्रस्तावना

भारतीय इतिहासात, 19 वे शतक, विशेषत: 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात, भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचा काळ मानला जातो. यावेळी अनेक ऋषीमुनींनी समकालीन भारतात प्रचलित असलेल्या धार्मिक आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला. या काळात, पंडिता रमाबाईंचे नाव सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध प्रखर प्रतिकार करणाऱ्या विचारवंतांमध्ये उल्लेखनीय आहे, ज्यांना भारताच्या पहिल्या स्त्रीवादी या उपाधीने संबोधले जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात पुरोगामी विचार व्यक्त करणाऱ्या तसेच त्या दृष्टिने कार्य करणाऱ्या विचारवंतामध्ये पंडिता रमबाई यांचे कार्य उलेखनीय ठरते. यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील दुर्बल, मागासलेल्या घटकास जीवन जगण्यासाठी आधार उपलब्ध झाला. अशा घटकांना जीवनात विकासाची एक नवी दृष्टि लाभली. समाज सुधारणे पुरोगामी सुधारक म्हणुन पंडिता रमाबाई याना ओळखले जाते. मध्ये अनेक विचारवंतानी योगदान दिले आहे. त्यातील पंडिता रमाबाई यांच्या कार्याचा उल्लेख अग्रक्रमांने केला जातो. मानवता, प्रेम तसेच सेवा भावी वृत्तीच्या पंडिता रमाबाई यांनी समाजसुधारणेच्या दृष्टिने मोठे योगदान दिले. त्यांनी आपल्या पुरोगामी विचाराच्या माध्यमातुन महाराष्ट्रात समाजपरिवर्तनास एक नवी दिशा दिली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान उलेखनीय ठरले. तात्कालीन परिस्थितीत स्त्री शिक्षणाच्या दृष्टिने प्रयत्न करणे हे धाडसाचे कार्य होते. हे धाडस त्यांनी केले. त्यातुनच त्यांच्या पुरोगामीत्वाची ओळख समाजासमोर निर्माण झाली. या कारणास्तव त्यांचा विचार व कार्याचा अढावा प्रस्तुत शोधनिबंधाद्वारे घेण्यात आलेला आहे.

संकेतशब्द

पंडिता रमाबाई; अनंतशास्त्री डोंगरे; कैसर्य-ए-हिंद; The High Cast Hindu Women; American Ramabai Association

© 2023 AAASSHER. All rights reserved.

Scroll to Top