Latest Issue
Research article | Open Access | Published: March 18, 2023
ब्रिटिश इतिहासकारांचा साम्राज्यवादी लेखन परंपरा : एक अभ्यास
गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर, ४१६०१२ भारत
प्रस्तावना
अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी भारताच्या बहुतांश भागांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यामुळे संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून ते दृढमूल करण्याच्या दृष्टीने इंग्रजांच्या साम्राज्यवादी आकांक्षा वाढली वाढीस लागल्या. आपली सत्ता दीर्घकाळ राहावी यासाठी भारतीय लोक इंग्रजांची सत्ता बिनविरोध मान्य करतील अशी उपाययोजना करणे इंग्रजांना आवश्यक वाटत होते. केवळ शस्त्राच्या बळावर अशाप्रकारचे वर्चस्व दीर्घकालिक राहू शकत नाही याची जाणीव इंग्रजांना झाली. त्यामुळे भारतीय वरील इंग्रजांच्या सत्तेला तार्किक आधार देणे गरजेचे होते. हा तात्विक आधार इंग्रजांना भारतीयांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरवत नेत्यांना भारतावर सत्ता गाजवण्याचा नैतिक अधिकार असल्याचे ठासुन सांगणारा नवा सिद्धांतम्हणजेत साम्राज्यवादाचा ब्रिटिश टीचर्स कारणे शोधून काढला भारतीय समाज हा मागासलेला गती हिन रानटी समाज आहे बौद्धिक आणि शास्त्रीय भौतिक प्रगतीमुळे इंग्लंड एस श्रेष्ठ व प्रगत राष्ट्र बनले आहे. भारतासारख्या मागासलेल्या देशात कायद्याचे राज्य आणायचे असेल तर प्रशासनात पाश्चात्य शिक्षणाच्या आधारे अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करावयास हवी असा सिद्धांत मांडला. इंग्लंड हे प्रगत आणि सुसंस्कृत राष्ट्र असल्यामुळे भारतासारख्या मागासलेल्या समाजाला सुसंस्कृत करणे आणि त्यांच्या उत्थानाचे कार्य ईश्वराने इंग्रजांवर सोपविले आहे अशा प्रकारच्या ग्राहकाच्या आधारे भारतीयांना इंग्रजाच्या तुलनेत कनिष्ठ ठरविले इंग्रजांच्या श्रेष्ठत्वाच्या आधारावर त्यांच्या भारतावरील सत्तेला नैतिक अधिष्ठान देण्याचे कार्य ज्या ब्रिटिश साम्राज्यवादी लेखन इतिहासकाराने केले. त्याचा प्रस्तुत आढावा थोडक्यात शोधनिबंधामध्ये घेण्यात आलेला आहे.
संकेतशब्द
ईस्ट इंडिया कंपनी; जेम्स मील; हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया; हेनी इलियट; माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन; ग्रँड डफ; जेम्स टाड
© 2023 AAASSHER. All rights reserved.