Latest Issue
Research article | Open Access | Published: March 21, 2023
कोल्हापूर जिल्ह्यातील दुग्धजन्य उत्पादनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप
कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय हडोळती, ता. अहमदपूर, जि.लातूर
प्रस्तावना
कोल्हापूर जिल्ह्यातल्या दुग्धजन्य उत्पादनाने देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपली गुणवत्तेद्वारे छाप निर्माण केली आहे. गोकुळ दूध संघाने श्रीलंके सारख्या देशाला मोठ्या प्रमाणात दूध भुकटी पाठवून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल टाकले होते. तर वारणा दूध संघाने सुद्धा आपले सुगंधी दूध ट्रेट्रापॅक मधून आखाती राष्ट्रांमध्ये पाठवून लौकिक प्राप्त केला आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर आहे. कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ), वारणा दूध संघ, यळगुड दूध संघ, स्वाभीमानी दूध संघ, शाहू दूध संघ असे अनेक सहकारी व खाजगी दूध संघ संकलन करतात. अमुल हा ब्रँन्ड देशात अग्रेसर मानला जातो. परंतु जिल्ह्यातील दूध संघांची सहाय्यकारी दुग्ध उत्पादने राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात विकली जातात. गोकुळ, वारणा व यळगुड यांच्या सहाय्यकारी दुग्ध उत्पादनांचा या संशोधन पेपरमध्ये अभ्यास करण्यात आला आहे.
संकेतशब्द
कोल्हापूर; गोकुळ; वारणा; यळगुड दूध संघ; स्वाभीमानी दूध संघ; शाहू दूध संघ; दूध भुकटी; देशी लोणी; कुकींग बटर; टेबल बटर; तूप; श्रीखंड; पनीर; दही; लस्सी; ताक; आम्रखंड; आईस्क्रिम; बासुंदी
© 2023 AAASSHER. All rights reserved.