
लातूर जिल्ह्यातील बोळेगाव या गावातील कुटुंबनियोजनाचा भौगोलिक अभ्यास
बिचकुंदे एस.एस.
संशोधक विद्यार्थी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ, नांदेड़ ४३१६०६ महाराष्ट्र, भारत
Keywords
लातूर जिल्हा बोळेगाव लोकसंख्या हिंदू मुस्लिम बौद्ध कुटुंब प्राथमिक आरोग्य केंद्र ऑरिस्टाटल सोरेनसAbstract
भारतास कुटुंबनियोजनाची विशेष गरज आहे. सध्या भारताची लोकसंख्या प्रतिवर्षी २.५% इतक्या झपाट्याने वाढत आहे। जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या २.४% क्षेत्रफळ असलेल्या भारतास आज एकूण जागतिक लोकसंख्येच्या १६.८% लोकांस पोसावे लागत आहे। राष्ट्राचा आर्थिक विकास झपाट्याने व्हावा, या उद्देशाने कुटुंबातील संततीच्या संख्येवर जाणूनबुजून घालण्यात येणारी मर्यादा। लोकसंख्यावाढीमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणी टाळता याव्यात, म्हणून अशी मर्यादा घालण्याची आवश्यकता भासते। लोकसंख्येची वाढ पर्याप्त मर्यादेपलीकडे म्हणजेच अनियंत्रितपणे होत गेल्यास, ती राष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या मार्गात अनेक अडथळे आणते आणि त्यामुळे जीवनमान सुधारणे कठीण होते; राष्ट्रीय उत्पन्नाची दरडोई वाढ फारच मंदगतीने होते; अन्नधान्याचा पुरवठा अपुरा पडून त्याची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते; लोकसंख्येतील अनुत्पादक वयोगटातील व्यक्तींचे व बेकारीचे प्रमाण वाढत जाते व बचतीमध्ये वाढ करून आर्थिक विकासास आवश्यक तेवढी भांडवल-संचिती करणेही जड जाते। म्हणूनच राष्ट्राचा आर्थिक विकास त्वरित होऊन सरासरी कौटुंबिक जीवनमान सुधारावे, ह्यासाठी लोकसंख्यावाढीवर कुटुंबनियोजनाद्वारे नियंत्रण घालण्याची गरज भासते। कुटुंबातील संततीची संख्या नियंत्रित करण्याबरोबरच दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवणे, हेही कुटुंबनियोजनाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे। संततिनियमनास प्रथमतः बऱ्याच राष्ट्रांमध्ये शासकीय विरोध होता व त्याचा प्रचार करण्याविरुद्ध कायदेही संमत करण्यात आले होते। हळूहळू हा शासकीय विरोध कमी होत गेला। प्रचारासाठी शासनांची संमती मिळत गेली व नंतर प्रचारामध्ये शासन स्वतः सहभागी होत गेले। स्वीडनच्या शासनानेच संततिनियमनाच्या प्रसारास प्रथम हातभार लावला व नगरपालिकांच्या संततिनियमन केंद्रांना आर्थिक मदत देऊ केली। इतर राष्ट्रांतील शासनांनीही संततिनियमनाच्या खाजगी संस्थांनी केलेल्या प्रयत्नास सहकार्य दिले। १९५० पासून भारतातही संततिनियमनाच्या प्रयत्नांना सरकारने मदत केली। १९४८ पासून जपानमध्ये गर्भपात कायदेशीर मानला जाऊ लागला व हळूहळू गर्भपाताचे प्रमाण कमी होत जाऊन अन्य मार्गांचा वापर अधिक प्रमाणावर होऊ लागला। संततिनियमनाच्या विविध साधनांचा वापर फार प्राचीन काळापासून होत आला आहे। ख्रिस्तपूर्व १८५० ते १५५० या काळातील काही ईजिप्शियन लेखांतून व प्राचीन हिब्रू वाङ्मयातून गर्भधारणा टाळण्याच्या अनेक उपायांचा उल्लेख आढळतो। ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात अॅरिस्टॉटल याने गर्भावरोधाच्या उपायांचे वर्णन केलेले आहे। त्याचप्रमाणे इ. स. दुसऱ्या शतकात सोरेनस या प्रसूतिशास्त्रवेत्त्याने संततिनियमनाच्या पद्धतीचे सविस्तर विवेचन करून गर्भपाताऐवजी गर्भधारणा टाळणे हा अधिक श्रेयस्कर मार्ग होय, यावर भर दिला। ग्रीक व रोमन काळांत स्त्रियांचे आरोग्य सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने गर्भावरोधास विशेष महत्त्व दिले जाई; परंतु गर्भसंभव टाळण्याच्या पद्धतींचा अवलंब फारच थोड्या नागरिकांना करता येत असे। गर्भावरोधाच्या तंत्राचा सार्वजनिक प्रसार मात्र एकोणिसाव्या शतकापर्यंत झाला नव्हता।
Received: 22 March 2023, Revised: 02 May 2023, Accepted: 06 May 2023, Available online: 08 May 2023
Cite As
बिचकुंदे एस. एस. (2023). लातूर जिल्ह्यातील बोळेगाव या गावातील कुटुंबनियोजनाचा भौगोलिक अभ्यास. International Journal of Arts, Social Sciences and Humanities, 01(02), 01–07. https://doi.org/10.5281/zenodo.10223686
Copyright © 2023 AAASSHER