
गर्भपात: एक नैतिक समस्या
प्रा. सुवर्णा उमाकांत टेंकाळे
तत्त्वज्ञान विभाग, कमायोगी तुळशीराम पवार महाविद्यालय, हाडोळती ता. अहमदपूर जि. लातूर ४१३५१४ महाराष्ट्र, भारत
Keywords
गर्भपात प्राचीन काळ स्त्री संगोपन जे. जे. थॉमसन अपंग माता-पिता विवाह मतिमंदAbstract
प्राचीन काळी सर्वच देशांमध्ये गर्भवती स्त्रीला मानाचे स्थान होते. त्या काळात गर्भपात भयंकर गुन्हा समजला जात असे, तसेच गर्भपातासंबंधी कोणत्याही प्रकारे सामाजिक किंवा कायदेशीर दृष्टिकोनातून विचार केला जात नसे. पण जेव्हा अनेक देशांची लोकसंख्या वेगाने वाढू लागली, तसेच आधुनिक वैद्यकीय सोयी सुविधामुळे जन्मपूर्व अवस्थेतील अडचणी अगोदरच लक्षात येऊ लागल्या तेव्हा गर्भपातासंबंधीचे नैतिक व कायदेशीर प्रश्न निर्माण झाले. गर्भधारणा करणे ही निसर्गाने स्त्रीला दिलेली देणगी होय. प्राचीन काळापासून असे मानले जाते की स्त्रीचे पूर्णत्व आई होण्यातच आहे. जेव्हा ती गर्भवती होऊन बाळास जन्म देते तेव्हाच तिला पूर्णत्व प्राप्त होते, परंतु आधुनिक काळात गर्भधारणे ऐवजी गर्भपाताच्या अधिकाराची मागणी स्त्रियाद्वारे केली जाऊ लागली आहे. बहुतांशी देशात गर्भपातास कायदेशीर मान्यता मिळालेली दिसून येते. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की, कायद्याने याला म्हणजेच गर्भपातला मान्यता मिळाली असली तरी नैतिक दृष्टिकोनातून हे योग्य आहे काय? एका निष्पाप जीवाची गर्भात हत्या करणे हे वैयक्तिक आणि सामाजिक पाप नाही काय? या विषयाचा संबंध केवळ स्त्रीस आहे की तिच्या गर्भात वाढणाऱ्या एका जीवाचाही प्रश्न आहे? जन्मास आलेल्या व्यक्तीप्रमाणे गर्भास जगण्याचा संपूर्ण अधिकार आहे की नाही? यासारखे अनेक प्रश्न गर्भपाताच्या समस्येच्या संदर्भात समोर येतात. त्यामुळे गर्भपात ही आधुनिक काळातील एक वैद्यकीय व नैतिक समस्या बनली आहे.
Received: 07 April 2023, Revised: 11 May 2023, Accepted: 14 May 2023, Available online: 17 May 2023
Cite As
प्रा. सुवर्णा उमाकांत टेंकाळे. (2023). गर्भपात: एक नैतिक समस्या. International Journal of Arts, Social Sciences and Humanities, 01(02), 12–16. https://doi.org/10.5281/zenodo.10223733
Copyright © 2023 AAASSHER