IJASSH, 2023, Vol. 1, Issue 2 (April - June)

Table of Content

लातूर जिल्ह्यातील बोळेगाव या गावातील कुटुंबनियोजनाचा भौगोलिक अभ्यास

बिचकुंदे एस. एस.

Page 01 - 07

DOI

भारतास कुटुंबनियोजनाची विशेष गरज आहे. सध्या भारताची लोकसंख्या प्रतिवर्षी २.५% इतक्या झपाट्याने वाढत आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या २.४% क्षेत्रफळ असलेल्या भारतास आज एकूण जागतिक लोकसंख्येच्या १६.८% लोकांस पोसावे लागत आहे. 

राष्ट्राचा आर्थिक विकास झपाट्याने व्हावा, या उद्देशाने कुटुंबातील संततीच्या संख्येवर जाणूनबुजून घालण्यात येणारी मर्यादा. लोकसंख्यावाढीमुळे उद्‌भवणाऱ्या आर्थिक अडचणी टाळता याव्यात, म्हणून अशी मर्यादा घालण्याची आवश्यकता भासते. लोकसंख्येची वाढ पर्याप्त मर्यादेपलीकडे म्हणजेच अनियंत्रितपणे होत गेल्यास, ती राष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या मार्गात अनेक अडथळे आणते आणि त्यामुळे जीवनमान सुधारणे कठीण होते; राष्ट्रीय उत्पन्नाची दरडोई वाढ फारच मंदगतीने होते. 

अन्नधान्याचा पुरवठा अपुरा पडून त्याची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते; लोकसंख्येतील अनुत्पादक वयोगटातील व्यक्तींचे व बेकारीचे प्रमाण वाढत जाते व बचतीमध्ये वाढ करून आर्थिक विकासास आवश्यक तेवढी भांडवल-संचिती करणेही जड जाते. म्हणूनच राष्ट्राचा आर्थिक विकास त्वरित होऊन सरासरी कौटुंबिक जीवनमान सुधारावे, ह्यासाठी लोकसंख्यावाढीवर कुटुंबनियोजनाद्वारे नियंत्रण घालण्याची गरज भासते. कुटुंबातील संततीची संख्या नियंत्रित करण्याबरोबरच दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवणे, हेही कुटुंबनियोजनाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. 

संततिनियमनास प्रथमतः बऱ्याच राष्ट्रांमध्ये शासकीय विरोध होता व त्याचा प्रचार करण्याविरुद्ध कायदेही संमत करण्यात आले होते. हळूहळू हा शासकीय विरोध कमी होत गेला. प्रचारासाठी शासनांची संमती मिळत गेली व नंतर प्रचारामध्ये शासन स्वतः सहभागी होत गेले. स्वीडनच्या शासनानेच संततिनियमनाच्या प्रसारास प्रथम हातभार लावला व नगरपालिकांच्या संततिनियमन केंद्रांना आर्थिक मदत देऊ केली. इतर राष्ट्रांतील शासनांनीही संततिनियमनाच्या खाजगी संस्थांनी केलेल्या प्रयत्नास सहकार्य दिले. १९५० पासून भारतातही संततिनियमनाच्या प्रयत्नांना सरकारने मदत केली. १९४८ पासून जपानमध्ये गर्भपात कायदेशीर मानला जाऊ लागला व हळूहळू गर्भपाताचे प्रमाण कमी होत जाऊन अन्य मार्गां चा वापर अधिक प्रमाणावर होऊ लागला. 

संततिनियमनाच्या विविध साधनांचा वापर फार प्राचीन काळापासून होत आला आहे. ख्रिस्तपूर्व १८५० ते १५५० या काळातील काही ईजिप्शियन लेखांतून व प्राचीन हिब्रू वाङ्‍मयातून गर्भधारणा टाळण्याच्या अनेक उपायांचा उल्लेख आढळतो. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात अ‍ॅरिस्टॉटल याने गर्भावरोधाच्या उपायांचे वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे इ. स. दुसऱ्या शतकात सोरेनस या प्रसूतिशास्त्रवेत्त्याने संततिनियमनाच्या पद्धतीचे सविस्तर विवेचन करून गर्भपाताऐवजी गर्भधारणा टाळणे हा अधिक श्रेयस्कर मार्ग होय, यावर भर दिला. ग्रीक व रोमन काळांत स्त्रियांचे आरोग्य सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने गर्भावरोधास विशेष महत्त्व दिले जाई; परंतु गर्भसंभव टाळण्याच्या पद्धतींचा अवलंब फारच थोड्या नागरिकांना करता येत असे. गर्भावरोधाच्या तंत्राचा सार्वजनिक प्रसार मात्र एकोणिसाव्या शतकापर्यंत झाला नव्हता. 

Cite as

बिचकुंदे एस. एस. (2023). लातूर जिल्ह्यातील बोळेगाव या गावातील कुटुंबनियोजनाचा भौगोलिक अभ्यास. International journal of arts, social sciences and humanities (IJASSH), 01(02), 01–07. https://doi.org/10.5281/zenodo.10223686

Mahatma Gandhi's Concept of Truth and Its Literary Interpretations in Indian Literature

More J. G.

Page 08 - 11

DOI

This research paper delves into Mahatma Gandhi’s concept of truth and its profound influence on Indian literature. Mahatma Gandhi’s unique interpretation of truth, central to his philosophy of Satyagraha, is explored through a careful analysis of his writings, including “The Story of My Experiments with Truth.” The paper also examines how Mahatma Gandhi’s ideas on truth have resonated in Indian literature, discussing influential authors who drew inspiration from his philosophy. It investigates literary interpretations of truth, delving into the use of symbolism and narrative techniques in these works. The paper also acknowledges controversies and challenges related to Mahatma Gandhi’s truth concept in literature, offering a glimpse into the enduring relevance of his ideas in the literary world.

Cite as

More J. G. (2023). Mahatma Gandhi’s Concept of Truth and Its Literary Interpretations in Indian Literature. International Journal of Arts, Social Sciences and Humanities (IJASSH), 01(02), 08–11. https://doi.org/10.5281/zenodo.10223716

गर्भपात: एक नैतिक समस्या

प्रा. सुवर्णा उमाकांत टेंकाळे

Page 12 - 16

DOI

प्राचीन काळी सर्वच देशांमध्ये गर्भवती स्त्रीला मानाचे स्थान होते. त्या काळात गर्भपात भयंकर गुन्हा समजला जात असे, तसेच गर्भपातासंबंधी कोणत्याही प्रकारे सामाजिक किंवा कायदेशीर दृष्टिकोनातून विचार केला जात नसे. पण जेव्हा अनेक देशांची लोकसंख्या वेगाने वाढू लागली, तसेच आधुनिक वैद्यकीय सोयी सुविधामुळे जन्मपूर्व अवस्थेतील अडचणी अगोदरच लक्षात येऊ लागल्या तेव्हा गर्भपातासंबंधीचे नैतिक व कायदेशीर प्रश्न निर्माण झाले. 

गर्भधारणा करणे ही निसर्गाने स्त्रीला दिलेली देणगी होय. प्राचीन काळापासून असे मानले जाते की स्त्रीचे पूर्णत्व आई होण्यातच आहे.जेव्हा ती गर्भवती होऊन बाळास जन्म देते तेव्हाच तिला पूर्णत्व प्राप्त होते, परंतु आधुनिक काळात गर्भधारणे ऐवजी गर्भपाताच्या अधिकाराची मागणी स्त्रियाद्वारे केली जाऊ लागली आहे. बहुतांशी देशात गर्भपातास कायदेशीर मान्यता मिळालेली दिसून येते. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की, कायद्याने याला म्हणजेच गर्भपातला मान्यता मिळाली असली तरी नैतिक दृष्टिकोनातून हे योग्य आहे काय? एका निष्पाप जीवाची गर्भात हत्या करणे हे वैयक्तिक आणि सामाजिक पाप नाही काय? या विषयाचा संबंध केवळ स्त्रीस आहे की तिच्या गर्भात वाढणाऱ्या एका जीवाचाही प्रश्न आहे? जन्मास आलेल्या व्यक्तीप्रमाणे गर्भास जगण्याचा संपूर्ण अधिकार आहे की नाही? यासारखे अनेक प्रश्न गर्भपाताच्या समस्येच्या संदर्भात समोर येतात. त्यामुळे गर्भपात ही आधुनिक काळातील एक वैद्यकीय व नैतिक समस्या बनली आहे.

Cite as

प्रा. सुवर्णा उमाकांत टेंकाळे. (2023). गर्भपात: एक नैतिक समस्या. International journal of arts, social sciences and humanities (IJASSH), 01(02), 12–16. https://doi.org/10.5281/zenodo.10223733

भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या: एक अभ्यास

रावसाहेब पिराजी इंगळे

Page 17 - 20

DOI

भारत हा कृषीप्रधान देश आहे पण या देशातील शेतकरी मात्र दु:खी, दारिद्र्य आहे. असेच आपणाला म्हणावे लागेल कारण दुःख व दारिद्र्याने जीवनात आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या लोकांची आकडेवारी पाहता त्यात सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांनीच केल्या आहेत. भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक संकटामुळे शेती उत्पादनात होणारी घट शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे व वाढता कर्जाचा डोंगर यामुळे भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचा अहवाल राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने व्यक्त केला आहे. अगदी अलीकडील काळात म्हणजे 2020 मध्ये देशात एकूण 5579 शेतकऱ्यांनी विविध कारणातून भारतातील शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची माहिती तत्कालीन कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली होती. 2019 ला देशात पाच हजार 957 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. 2020 मध्ये 2019 च्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्ये किंचित घट झाली असली तरी हा आकडा कमी नाही. कृषी प्रधान अर्थव्यवस्थेत शेतकरी आत्महत्येचे कारणे सांगताना NCRB ने कौटुंबिक समस्या, आजारपण, अमली पदार्थांचा गैरवापर, व्यसन, प्रेमप्रकरणे, विवाहसंबंधीचे मुद्दे, परीक्षेतील अपयश, संपत्ती वाद इत्यादी कारणे दिलेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशक उलटून गेली तरी भारत सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देता आला नाही असेच म्हणावे लागेल. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हा आज अन्नसुरक्षा योजनेद्वारे स्वस्त धान्य दुकानाच्या रांगेस उभारून धान्य खरेदी करतो. याचे मुख्य कारण म्हणजे पारंपरिक पद्धतीची शेती ही आहे.

Cite as

रावसाहेब पिराजी इंगळे. (2023). भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या: एक अभ्यास. International journal of arts, social sciences and humanities (IJASSH), 01(02), 17–20. https://doi.org/10.5281/zenodo.10223758

The Role of Libraries in Promoting Gandhian Philosophy in the Digital Age

Dr. Mortale H. N.

Pages 21 - 25

DOI

This research paper delves into the vital role of libraries in the digital age in preserving and promoting Gandhian philosophy. Mahatma Gandhi’s enduring principles of truth, nonviolence, and self-reliance continue to hold significance in our ever-evolving world. Libraries, as custodians of knowledge and cultural heritage, have a unique opportunity to disseminate these ideals to a broader audience. This paper explores the strategies employed by libraries, the challenges they face, and the impact of their efforts. It underscores the enduring relevance of Gandhian philosophy in the contemporary landscape and how libraries can actively contribute to its preservation and dissemination, thus fostering a deeper understanding of this remarkable legacy.

Cite as

Dr. Mortale H. N. (2023). The Role of Libraries in Promoting Gandhian Philosophy in the Digital Age. International Journal of Arts, Social Sciences and Humanities (IJASSH), 01(02), 21–25. https://doi.org/10.5281/zenodo.10223763

प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांमधील अवधान अस्थिरता व अतीक्रियशील विकृतीच्या प्रसराचा अभ्यास

डॉ. क्षीरसागर ओ. एम., ढवळे पंकज बालाजी

Page 26 - 30

DOI

सध्याच्या धावपळीच्या स्पर्धेच्या आणि वेगवान जीवनात प्रत्येक पालकांना आपली मुले स्पर्धेत टिकले पाहिजे त्याने स्पर्धेच्या जगात सर्वांसोबत असले पाहिजे. या हेतूने 21 व्या युगातील पालक विविध नवनवीन तंत्राचा, एप्लिकेशन्स इत्यादीचा सरास वापर करण्यासाठी त्यांना वाव देताना दिसत आहेत. त्यामुळे काही वेळा ती भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या तसेच शारीरिक दृष्ट्या बाधित होऊन शारीरिक, मानसिक बदलामुळे विविध प्रकारच्या विकृतींना सामोरे जात आहेत. आधुनिक काळात या विकृत लक्षणांचे प्रमाण त्यांच्या वर्तनात फार झपाट्याने वाढताना आढळत आहेत. विकसित मुलांच्या वर्तनात सामान्यता विघातक, तोडफोड वृती, किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीला प्रतिक्रिया देताना अपमानास्पद बोलणे, असंयमी वर्तन, प्रतिक्रिया इत्यादी हालचाली वर्तनात दिसून येतात. आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा मिळत आहेत. पण ती मुले प्रत्यक्षात एक एकटी राहण्यात जास्त आणि मित्रपरिवार यांच्यामध्ये कमी प्रमाणात राहताना दिसत आहेत. त्यांना बाहेरच्या वातावरणाचा संबंध कमी प्रमाणात येतो. ते आज-काल मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम, इंटरनेट विविध एप्लीकेशन आणि सामाजिक प्रसार माध्यमे इत्यादी साधनांच्या वापरामुळे एकांतात राहणे पसंत करताना दिसत आहेत. आई वडील नातेवाईक यांच्याकडून त्यांना जास्त वेळ मिळत नाही. मिळाला तर तो वेळ लाड करणे किंवा शिस्त लावण्यात जातो. परिणामी मग ती मुले कुठल्यातरी आजार किंवा विकृतिशी जोडली जातात. मुलांमध्ये विविध प्रकारचे दोष दिसायला लागतात. जसे की बोलण्यात, लिहिण्यात, वाचण्यात, बसण्यात, क्रिया करताना अशी दोष असणारी प्रत्येक मुलं हे अवधान अस्थिरता व अतिक्रियाशील विकृतीची पण असण्याची शक्यता असते.

 

Cite as

डॉ. क्षीरसागर ओ. एम., & ढवळे पंकज बालाजी. (2023). प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांमधील अवधान अस्थिरता व अतीक्रियशील विकृतीच्या प्रसराचा अभ्यास. International journal of arts, social sciences and humanities (IJASSH), 01(02), 26–30. https://doi.org/10.5281/zenodo.10223771

© 2023 AAASSHER. All rights reserved.

Scroll to Top